![]() |
UNO MINDA या ऑटोमोबाईल क्षेत्रातील पार्टस आणि ऍक्सेसरीज बनवणाऱ्या कंपनी ने त्यांचे कार DVR हे प्रोडक्ट ADAS फिचर सह लाँच केले आहे. हा एक डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर आहे,
जो कोणत्याही गाडी मध्ये बसवता येईल,यामुळे तुम्हाला गाडी चालवताना फार मदत होईल.
यामधील लेन अस्सिस्ट फिचर जे हायवेवर ड्रायव्हर ला लेनमधून गाडी दुसऱ्या लेन मध्ये जात असेल तर वॉर्निंग देईल
तसेच एखादी गाडी समोरून फार जवळ आली किंवा किंवा कोणती गाडी अचानक समोर आली तर हि सिस्टम ड्राइवर ला अलर्ट करेल.
आता मार्केट मध्ये कंपनी फिटेड ADAS सिस्टिम च्या गाडीची किंमत खूप जास्त आहे, टॉप व्हेरिएंट च्या मॉडेल मध्येच हे आपल्याला पाहायला मिळते, पण UNO MINDA ने प्रोडक्ट फक्त ६९९० रुपयाला बाजार पेठेत आणले आहे,
त्यामुळे हे सर्वसामान्यांना परवडणारे आहे. याचा फायदा ट्रक बसेस चालक याना देखील होणार आहे जे सतत लांबचा प्रवास न थांबता करतात.
टिप्पणी पोस्ट करा