आपण भविष्यातील इंधन म्हणून हायड्रोजन कडे पाहत आहोत हे आपण ऐकले असेल पहिले असेल पण हा हायड्रोजन वातावरणातून कसा वेगळा केला जातो त्याचे प्रकार किती व कोणते आणि आपल्या वातावरणाला पूरक कोणता हायड्रोजन आहे हे आपण पाहणार आहोत
हायड्रोजन हा अति ज्वलनशील पदार्थ आहे पण जर तो फक्त एकटा असेल, आपल्याला तर माहीतच आहे कि हायड्रोजन
आणि ऑक्सिजन मिळून पाणी तयार होते ज्या शिवाय जीवसृष्टी निर्माण आणि राहून शकत
नाही
हायड्रोजन चे सहा प्रकारात
वर्गीकरण केलेले आहे यामध्ये ग्रे, ब्राऊन ब्लु ग्रीन पिंक व्हाईट
हायड्रोजन चा समावेश आहे हि वर्गवारी हायड्रोजन कोणत्या पद्धतीने वेगळा केला जातो
यावर ठरवले आहे
ग्रे म्हणजे करडा हायड्रोजन हा मिथेन या नैसर्गिक वायूला बाष्प
रूपात आणून बनवला जातो.
ब्राउन म्हणजे तपकिरी हायड्रोजन कोळसा जाळून त्यापासून तयार होणाऱ्या
वायूवर प्रक्रिया करून तयार केला जातो.
ब्लु म्हणजेच निळा हायड्रोजन
हा ग्रे आणि ब्राउन हायड्रोजन प्रमाणेच पण यातील कार्बनडाय ऑक्साईड साठवून
त्यापासून उत्पन्न करतात/
ग्रीन हायड्रोजन हा
पाण्यापासून म्हणजे पाण्यामध्ये इलेक्ट्रिक प्रवाह सोडून ज्या पद्धतीला
इलेक्ट्रोलिसीस म्हणतात अशा पद्धतीने तयार करतात.
पिंक म्हणजेच गुलाबी
हायड्रोजन इलेकट्रोलिसीस पद्धतीनेच बनवतात पण यामध्ये अणुशक्ती चा वापर केला जातो.
आणि शेवटची पद्धत ,म्हणजेच
व्हाईट हायड्रोजन जो निसर्गनिर्मित पृथ्वीच्या गर्भाशयात सापडतो पण आता तो
नामशेष झाला आहे या सर्व प्रकारामध्ये ग्रीन हायड्रोजन हा
सर्वात लाभदायक निसर्गाला आणि वातावरणाला कोणती हि इजा न पोहोचवणारा हायड्रोजन आहे
आणि हाच आपल्या भविष्यातील इंधनाचा स्रोत असेल असे जगातील खूप तज्ज्ञांचं मत आहे.
आपण थोडक्यात जाणून घेऊ कि या ग्रीन हायड्रोजन कडेच का भविष्यातील इंधन पाहिलं जातेय.
पाणी हे हायड्रोजन चे २ अनु आणि ऑक्सिजन चा एक अनु यापासून तयार होते
याच पाण्याचे विघटन करून ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळा केला जातो, म्हणजेच जरी हायड्रोजन वेगळा करून
वापरला तरी ऑक्सिजन चे उत्सर्जन होईल. जो आपल्या वातावरणासाठी अतिशय उपयुक्त आहे याचा अर्थ यामधून कार्बन
उत्सर्जन शून्य टक्के होईल म्हणून पूर्ण जग याकडे भविष्यातील इंधन म्हणून पाहत आहे.
जगातील इंडस्ट्रियल सेक्टर हे एकूण ऊर्जेच्या २० टक्के ऊर्जा खर्च
करते आणि हेच सेक्टर तेवढेच कार्बन उत्सर्जन देखील करते या क्षेत्रामध्ये जर ग्रीन
हायड्रोजन चा उपयोग केला गेला तर शून्य कार्बन उत्सर्जन चे ध्येय गाठणे अवघड नाही, तसेच दळण वळणाची सर्व साधने जर
हायड्रोजन फ्युएल सेल चा वापर करून आताच्या इंधन स्रोत जसे कि डिझेल किंवा पेट्रोल
च्या पेक्षा जास्त पॉवर आणि कमीत कमी प्रदूषण करायला उपयोगी पडेल.
पण, ग्रीन हायड्रोजन हा आज हि कमी प्रमाणात तयार केला जातोय, कारण आहे त्याचा तयार करण्यासाठी येणारा खर्च हा जास्त आहे. जगातील खूप संशोधन संस्था हा खर्च कसा कमी होईल, यासाठी प्रयत्न करीत आहेत.
आपण आशा करूया कि, एक
दिवस या सर्व प्रयत्नांना यश येईल.
आणि ग्रीन हायड्रोजन सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत असेल आणि आपली पृथ्वी परत
एकदा प्रदूषण मुक्त असेल आणि आता आपल्याला जे ग्लोबल वॉर्मिंग च संकट जे भेडसावत
आहे त्या पासून आपल्याला दिलासा मिळेल.
टिप्पणी पोस्ट करा