रेनॉल्ट कंपनीची डस्टर आता मॉडर्न डिझाईन आणि नवीन इंजिन सह लवकरच भारतात दाखल होणार

 2024 ची नवीन रेनॉल्ट डस्टर हि गाडी आपल्या नवीन  डिझाईन आणि  इंजिन पर्यायांसह भारतामध्ये दाखल होणार आहे. 

हि गाडी आता सरळ भारतामध्ये पसंतीस उतरलेल्या हुंदाई क्रेटा, किया सेलटॉस, टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर आणि मारुती सुझुकीची ग्रँड व्हिटारा या गाड्यांशी सरळ स्पर्धा करेल. 

नवीन रेनॉल्ट डस्टर सब मीटर SUV सेगमेंट मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात DACIA लोगो सह शोकेस करण्यात आली होती. DACIA  हा रेनॉल्ट चा सब ब्रँड आहे, पण आता डस्टर रेनॉल्ट च्या नावासहित  सहित शो केस केली आहे. 

नवीन डस्टर चे फ्रंट पूर्णपणे नवीन आणि आकर्षक बनवण्यात आले आहे. नवीन रेडिएटर ग्रिल नवीन हेडलॅम्प आणि रेनॉल्ट च्या लोगो ऐवजी पूर्ण रेनॉल्ट चे बॅजिंग हे आहे. गाडीच्या लांबी व्हीलबेस  मध्ये काही फरक केलेला नाही. आधी च्या  गाडी एवढीच लांबी 4343 mm आणि व्हीलबेस 2657 mm ठेवण्यात आली आहे नवीन डस्टर मध्ये ७ इंचाचे  व्हर्चुअल डॅशबोर्ड क्लस्टर आणि 10  इंचाचे  टचस्क्रीन मल्टिमीडिया स्क्रीन या गाडीमध्ये पाहायला मिळेल. 2024 च्या रेनॉल्ट डस्टर मध्ये 1ली. TCe पेट्रोल  इंजिन  1 ली. माईल्ड हायब्रीड ऑप्शन आणि ऑल व्हील ड्राईव्ह सिस्टिम सह टॉप व्हेरिएंट मध्ये 1ली. फोर सिलेंडर  इंजिन इलेक्ट्रिक मोटर सह उपलब्ध होईल. या गाडीचे सात सिटचे व्हर्जन देखील मार्केटमध्ये आणण्याचा कंपनीचे मानस आहे, जे सरळ टाटा सफारी हुंदाई अल्काझार आणि मग हेक्टर प्लस शी स्पर्धा करेल.

रेनॉल्ट डस्टर या गाडीने काही वर्षांपूर्वी भारतामध्ये धुमाकूळ घातला होता. ५ मीटर  मिड SUV सर्वात जास्त ग्राउंड कलेअरन्स मस्क्युलर फेंडर बॉडी लाईनमुळे हि गाडी भारतामध्ये खूप पसंद केली गेली. या गाडीचे फेसलिफ्ट एकदाच आले होते. पण नंतर या गाडीचे उत्पादन भारतामध्ये बंद करण्यात आले होते कंपनी ने या गाडीचे भारतामधील मार्केट ओळखून हि गाडी परत नवीन रूपात मॉडर्न डिझाईन सह परत लाँच करत आहे


नवीन रेनॉल्ट डस्टर सब मीटर SUV सेगमेंट मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात DACIA लोगो सह शोकेस करण्यात आली होती. DACIA  हा रेनॉल्ट चा सब ब्रँड आहे पण आता डस्टर रेनॉल्ट च्या लोगो सहित शो केस केली आहे. रेनॉल्ट हा ब्रँड भारतामध्ये पसंद केला जातो रेनॉल्ट ची ट्रायबर कायगर क्विड या कर भारतामध्ये चांगल्या विकल्या जातात.  

Old Model Renault Duster


 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने