जर्मन लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझ 2024 मध्ये भारतात 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

 जर्मन लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझ 2024 मध्ये भारतात 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार  


जर्मन लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझ 2024 मध्ये भारतात 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे आणि या वर्षी ईव्हीसह 10-12 हून अधिक नवीन कार आणण्याची तयारी करत आहे. 2024 मध्ये, मर्सिडीज-बेंझ इंडिया 12 हून अधिक नवीन वाहने सादर करण्याची योजना करत आहे, ज्यामध्ये तीन इलेक्ट्रिक मॉडेल्सचा समावेश आहे.

मर्सिडीजला येत्या पाच वर्षांत भारतातील 25 टक्के विक्री इलेक्ट्रिक वाहनांमधून येण्याची अपेक्षा आहे.

मर्सिडीज बेंझची 30 वर्षे साजरी करत असताना हे वर्ष एक विशेष वर्ष आहे. आम्ही पुण्यातील आमच्या कारखान्यात आणखी 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत.” मर्सिडीज बेंझ भारतात ३० वर्षे पूर्ण करत आहे. कंपनी पुण्यातील फॅक्टरी मध्ये  200 कोटी रुपये अधिक गुंतवण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे भारतातील एकूण गुंतवणूक 3,000 कोटी रुपये होईल.ही गुंतवणूक मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स, नवीन प्रोडक्ट स्टार्टअप आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेचे डिजिटायझेशन यासाठी असेल, मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ संतोष अय्यर यांच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीनुसार,

मर्सिडीजने 2023 मध्ये भारतात विक्रमी 17,408 कार विकल्या, 2022 च्या तुलनेत 10 टक्क्यांनी जास्त आहे.  मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ संतोष अय्यर यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने