भारताची माफिया कार महिंद्रा स्कॉर्पिओ
पहिला फेसलिफ्ट एप्रिल 2006 मध्ये महिंद्राने स्कॉर्पिओचा लाँच केला होता. दिल्लीतील ऑटो एक्स्पो 2006 मध्ये महिंद्राने सीआरडी इंजिन असलेली हायब्रीड स्कॉर्पिओ आणि पिकअप ट्रकवर आधारित स्कॉर्पिओ चे प्रदर्शन करून स्कॉर्पिओ मॉडेलवर आपल्या भविष्यातील योजनांचे प्रदर्शन केले. फोर्डचे माजी कर्मचारी अरुण जुआरा यांनी भारतात विकसित केलेले हे पहिले हायब्रीड वाहन आहे उभ्या टेल लाईट्स रूफरेल्स आणि सुधारित इंजिनमुळे गाडीचा परफॉर्मन्स देखील अजून वाढला.
दुसरा फेसलिफ्ट महिंद्रा स्कॉर्पिओचा मुख्यतः कॉस्मेटिक होता, ज्यात हेडलाईट हाऊसिंग, बोनेट आणि बंपर डिझाइनसह महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते. पॉवर आणि टॉर्कमध्येही किरकोळ वाढ झाली.14 एप्रिल 2009 रोजी, महिंद्राने 2008 एसएई वर्ल्ड काँग्रेसमध्ये त्यांच्या स्कॉर्पिओ एसयूव्हीच्या डिझेल-इलेक्ट्रिक हायब्रिड आवृत्तीची संकल्पना उघड केली. महिंद्रा स्कॉर्पिओ गेटवे 2009 च्या मध्यात ऑस्ट्रेलियात लाँच करण्यात आली होती, तेथे महिंद्रा पिक-अप म्हणून विपणन केले गेले होते. सध्याच्या २ स्टार एएनसीएपी रेटिंगवरून किमान ३ स्टार पर्यंत रेटिंग वाढविण्याच्या प्रयत्नात याला एबीएस ब्रेक आणि एअरबॅग्ज सारख्या भारतीय मॉडेलच्या तुलनेत अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्ये मिळाली.
तिसरा फेसलिफ्ट महिंद्रा स्कॉर्पिओला 25 सप्टेंबर 2014 रोजी आपला फेसलिफ्ट मिळाला होता, ज्यात नवीन डिझाइन केलेले फ्रंट आणि रियर फॅसिया आणि नवीन डॅशबोर्ड होता. २०१५ मध्ये स्कॉर्पिओचे सुधारित ऑटोमॅटिक रूप लाँच करण्यात आले आणि २०१८ मध्ये स्कॉर्पिओ एस ११ च्या लाँचिंगमुळेऑटोमॅटिक ट्रान्समिशन बंद करण्यात आले.
सेकंड जनरेशन स्कॉर्पिओ 27 जून 2022 ला सादर करण्यात आली आणि 21 जुलै 2022 रोजी महिंद्राने किमती सादर केल्या आणि ३० जुलै २०२२ ला बुकिंग सुरु करण्यात आले
सेकंड जनरेशन स्कॉर्पिओ मध्ये पूर्ण बदल करण्यात आला साईज वाढवण्यात आली नवीन दमदार इंजिन देखील यात वापरण्यात आले आपण तिला स्कॉर्पिओ एन म्हणून ओळखतो पुण्याच्या चाकण मधील प्लांट मध्ये हिची निर्मिती होते
2.0 लीटर टर्बोचार्जड पेट्रोल इंजिन सह हि गाडी 203 PS (200 hp; 149 kW) power and 370 N⋅m (273 lb⋅ft; 38 kg⋅m) torque निर्माण करते
डिझेल इंजिन दोन पर्यायामध्ये उपलब्ध आहे 132 PS (130 hp; 97 kW) power and 300 N⋅m (221 lb⋅ft; 31 kg⋅m) torque
आणि 175 PS (129 kW; 173 hp) power and 400 N⋅m (295 lb⋅ft; 41 kg⋅m) torque (380 N.m for manual variants) तसेच हि गाडी शिफ्ट ऑन फ्लाय four व्हील ड्राईव्ह पर्यायामध्ये उपलब्ध आहे
या गाडीने नेहमीच भारतीय ग्राहकांच्या मनावर राज्य केले आहे ब्लॅक रंगाची स्कॉर्पिओ हि आज देखील माफिया लोकांची पहिली पसंद आहे
टिप्पणी पोस्ट करा