नैसर्गिक इंधने (डिझेल, पेट्रोल,LPG,)
वाहनाचा शोध लागला इंटर्नल कंम्बशन इंजिन (ICE) ने ज्याची सुरुवात झाली. पेट्रोल हे पहिले इंधन होते, ज्या वर गाडी चालवली जायची पूर्वी ट्रक सुद्धा पेट्रोल वरच चालायचे नंतर डिझेल वापरू लागले. त्यानंतर L P G गॅस चा शोध लागला.पण मग हे इंधन असताना मानवाला बॅटरी Powered गाड्यांची का गरज भासली. वरील सर्व इंधने हि नैसर्गिक रित्या पृथ्वीच्या गर्भाशयात हजारो वर्षांपासून पृथ्वीवर व तिच्या अंतर्भागात जी उलथापालथ झाली. पृथ्वी च्या उत्पत्तीनंतर किती तरी वेळा जीवसृष्टी निर्माण झाली, आणि आणि नष्ट पण झाली ते जे काय अवशेष गाडले गेले त्याच्यावर हजारो वर्ष उष्णतेचा परिणाम होऊन त्याच द्रवात रूपांतर झालं त्यालाच आपण क्रूड ऑइल म्हणतो आणि या ऑइल वरच प्रक्रिया करून मानवाने डिझेल पेट्रोल L P G गॅस अशी इंधने बनवली पण हा इंधन साथ मर्यादित आहे.
करोडो बॅरल क्रूड ऑइल रोज जमिनीतून काढलं जात, आणि पूर्ण जगाला पुरवलं जात. एक ना एक दिवस हे संपणार आहे. काही देशांमध्ये तर आता भूगर्भात क्रूड ऑइल सापडणं बंद झालाय त्यामुळे पर्यायी इंधन शोधणे गरजेचे आहे तसेच या इंधनाचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात केला जातोय, कि या याच ज्वलन झाल्यावर कार्बन मोनोऑक्साईड सारखा सजीव सृष्टीला तसेच वातावरणाला हानिकारक असलेल्या वायूची निर्मिती होते.
जे काय पृथ्वीवर निर्माण झालं, ते निसर्गातूनच निर्माण झालेलं आहे. प्रत्येक वस्तू जी या पृथ्वीवर आहे मग ती जीवसृष्टी असू देत खनिजे असू दे धातू असू दे अनेक धातू किंवा खनिजे यांचं योग्य मिश्रण करून त्यातून नवीन धातू खनिजे यांची निर्मिती होते,यालाच आपण संशोधन म्हणतो.
पृथीवरच्या गुरुवत्कर्ष शक्तीचा हवेचा पाण्याचा अगदी सूर्यप्रकाशाचा देखील वापर मानवाने आपल्या भल्यासाठी केला. त्यातून नवी गोष्टी निर्माण केल्या.आता, आपल्याला प्रदूषण विरहित वातावरणाला व जीवसृष्टीला आणि आपल्या पृथ्वीला हानी न पोहोचवणाऱ्या थोडक्यात शून्य प्रदूषण करणाऱ्या इंधनाची निर्मिती करणे हि काळाची गरज आहे.
विद्युत ऊर्जा हि अशी गोष्ट आहे, जी पाण्याच्या प्रवाहाची ताकद, सूर्याची किरणे, हवेचा वेग, अगदी समुद्राच्या लाटांचा देखील वापर करून तयार करता येते.
तयार झालेली इलेक्ट्रिक पॉवर साठवण्यासाठी बॅटरी चा वापर होतो. पूर्वी विद्युत ऊर्जा साठवण्यासाठी अल्कलाईन,लीड ऍसिड इ प्रकारच्या बॅटरीज वापरल्या जायच्या, ज्यांना चार्ज करण्यासाठी फार वेळ लागायचा त्यांची साईज मोठी होती, पण स्टोरेज क्षमता कमी होती, आणि लवकर डिस्चार्ज व्हायची. पारंपारिक, पेट्रोल किंवा डिझेल कारमध्ये 1,000+ पेक्षा जास्त हलणारे भाग (moving parts) असतात उदा. पिस्टन, crank, टाइमिंग बेल्ट आणि त्याला जोडलेली बरेच व्हील्स, स्टार्टर पुल्ली, अल्टरनेटर पुल्ली, ड्राईव्ह शाफ्ट अजून असे खूप आहेत, याचा सरळ परिणाम मेंटेनन्स खर्चावर होतो ICE गाड्याना वारंवार ऑइल बदल इंजिन ओव्हरहॉल हे करावंच लागत. क्लच प्लेट प्रेशर प्लेट फ्लाय व्हील अशा महागड्या पार्टस मुळे दुरुस्तीची किंमत आपोआप वाढते, तसेच जशी जशी गाडी जुनी होत जाते तसतसे इंजिन पार्ट झिजतात, आणि नवीन गाडी सारखी पावर इंजिन कडून तयार होत नाही.
या तुलनेत इलेक्ट्रिक कार मध्ये हे 100 पेक्षा जास्त हलणारे भाग (moving parts) पार्ट नाहीत, त्यामुळे दुरुस्ती खर्च नसल्यासारखाच आहे. इंजिन ऐवजी इलेक्ट्रिक मोटर चा वापर केल्यामुळे ध्वनी प्रदूषण नाही ICE कर च्या तुलनेत EV चालवण्याचा इंधन खर्च निम्म्यापेक्षा कमी आहे.जरी, इलेक्ट्रिक व्हेईकल एवढ्या सुविधा आणि पैशाची बचत करतात.
बॅटरी चार्जिंग साठी लागणारा वेळ हा पेट्रोल डिझेल भरण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत जास्त आहे, तसेच चार्जिंग स्टेशन ची संख्या देखील कमी आहे गाडीची किंमत आणि Lithium-ion हे ठराविक देशांमध्येच सापडत असल्यामुळे बॅटरी ची किंमत जास्त आहे त्यामुळे IC इंजिन च्या गाडी पेक्षा EV महाग आहे.
lithium-ion बॅटरी ला पर्याय म्हणून जगातील शास्त्रज्ञ अन्य पर्यायावर संशोधन करत आहेत ज्यामध्ये Aluminum air बॅटरी, Diamond battery अणू ऊर्जेतून जे टाकाऊ पदार्थ वातावरणात उत्सर्जित होऊ नये म्हणून पाण्याखाली ठेवले जातात त्यांना स्फटिकांमध्ये बंद करून त्यापासून इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्याचे देखील संशोधन सुरु आहे.
आपण आशा करूया, कि निसर्गाला ला पूरक नवीन ऊर्जा स्रोतांमुळे आपल्या पृथ्वीला तिचं गत वैभव परत मिळेल, आणि आपण तापमान बदलामुळे भावी काळात येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढू शकू.
टिप्पणी पोस्ट करा