या वस्तू जरी आपल्याला महत्वाच्या वाटत नसल्या तरी जेंव्हा गाडी रस्त्यात बंद होते तेंव्हा किंवा गाडी चालवणं आणि प्रवास सुखकर होण्यासाठी या गोष्टी मदत करत असतात.
Fuse आता च्या सर्व कार या ECU ऑपरेट करत असतो, अशा वेळी प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट ला शॉर्ट सर्किट पासून वाचवण्यासाठी मध्ये एक फ्युज ब्रेकर लावलेला आहे. गाडीचा फ्युएल सप्प्लाय असेल, किंवा सेन्सर असेल पॉवर विंडो असेल, अगदी गाडी चे इग्निशन असेल सर्व ठिकाणी सर्किट च्या माध्यमातून डेटा आदान प्रदान होत असते. गाडीमध्ये इलेक्ट्रिक सप्लाय ब्रेक होणे हि सर्वसाधारण गोष्ट आहे. रात्रीच्या वेळी गाडीचे हेडलाईट अचानक बंद झाले, तर हा फ्युज burn चा प्रॉब्लेम जास्त असतो. अशा वेळी तेंव्हा या एक्स्ट्रा फ्युज तुम्हाला उपयोगी पडतील.
Tire inflation kit कारला टायर आता ट्युबलेस च वापरले जातात. हे टायर पंक्चर झाल्यावर एकदम हवा जात नाही गाडी चालू शकते, पण जर पंक्चर मोठा असेल तर एकदम हवा जाऊ शकते. अशावेळी हे किट आपल्या गाडीत असेल, तर आपणाला हवा भरता येईल, आणि प्रवास पुढे करता येईल.
Puncture removal kit- आपल्या गाडीमध्ये स्पेअर टायर नसेल, किंवा त्याचा वापर न झाल्यामुळे ट्युबलेस टायर ची हवा कमी होते. आणि जर गाडीचा टायर पंक्चर झाला तर आपल्याकडे Air Inflation Kit आणि पंक्चर किट असेल, तर आपल्याला निर्जन स्थानी किंवा रात्रीच्या वेळी घाटात जर असा प्रसंग आला तर हे खूप उपयोगी ठरेल.
Spare Wheel गाडी मध्ये असणे खूपच महत्वाचं आहे. याच महत्व आपल्या सर्वाना माहित च आहे.. Air inflation Kit आणि पंक्चर किट सोबत असल तरी spare wheel असल पाहिजे. माझ्याच बाबतीत असं घडलं आहे, कि पावसामध्ये पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्यात पुढील चाक वेगाने आपटले. आणि टायर कट झाला तो पंक्चर निघणे अशक्य होत. अशावेळी जर spare व्हील नसेल आणि हे जर रात्री पावसात आणि एखाद्या हायवेच्या बोगद्यामध्ये घडलं तर, फक्त spare wheel व्हील मदत करू शकते.
OBDII tool- हे टूल खरं तर मेकॅनिक बांधवांकडे असते हे टूल तुम्हाला ऑनलाइन ३०० ते ५०० रुपयात मिळेल, गाडीमध्ये जर काय अडचण आली. तर आताच्या सर्व गाड्यांमध्ये मीटर कन्सोल मध्ये चेक लाईट दिसते. काही नवीन गाड्यांमध्ये तर एखादा बल्ब गेला, तरी चेक लाईट दिसते. हे टूल तुम्हाला चेक लाईट का येत आहे स्कॅन करून सांगेल. या टूल चा पोर्ट प्रत्येक गाडी मध्ये शकतो स्टिअरिंग च्या खाली असतो.
Micro fiber cloth जर साध्या कपड्याने front windshield जेंव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी पुसता, तेंव्हा समोरून येणाऱ्या वाहनाच्या लाईटचा प्रकाश विस्कटून दिसतो. यामुळे दृष्यता कमी होते, पण Micro fiber Cloth ने ती स्वच्छ तर होतेच पण दृश्येतेवर कोणताही परिणाम होत नाही.
Car Mobile Charger- आता नवीन प्रत्येक गाडीमध्ये inbuilt type-C सॉकेट आणि USB सॉकेट येते पण जर तुमची गाडी जुनी असेल, तर त्यामध्ये फक्त 12 व्होल्ट चा सिगारेट lighter सॉकेट(Auxiliary power- socket)येत असे. त्यामध्ये charger लावून मोबाइल चार्ज करावा लागायचा. आज मोबाइल म्हणजे फक्त कम्युनिकेशन च साधन नसून बँक पण आहे. ऑफिस पण आहे. नेव्हिगेशन च साधन आहे. त्यामुळे चार्जर असणे महत्वाचे आहे.
Mobile Holder- कारमध्ये जर आपण मोबाइल वर GPS नेव्हिगेशन लावले असेल, तर आपल्याला मोबाइलला स्क्रीन कडे पाहावे लागते. कार मध्ये मोबाइलला होल्ड करण्यासाठी जागा नसते. अशावेळी मोबाइलला होल्डर ची खूप मदत होते.
Insulated tape- गाडी जुनी असेल, किंवा नवीन उंदीर हा गाडीचा फार मोठा शत्रू आहे. वायरिंग कुरतडणे किंवा सीट्स कुरतडणे या गोष्टी उंदीर करत असतात. गाडीच्या आतील किंवा इंजिन कंपार्टमेन्ट मधील वायर जर आपल्याला कोटिंग विरहित दिसत असेल तर किंवा अशा वायरच्या शॉर्ट सर्किट मुळे एखादी फ्युज गेली ती तुम्ही बसवली, पण जर हा प्रॉब्लेम लक्षात आल्यावर त्या वायर ला इन्सुलेटेड टेप लावणे महत्वाचे आहे. हि जरी गोष्ट खूप साधी वाटत असली तरी प्रवासात अशावेळी आपल्याकडे या गोष्टीला पर्याय नसतो.
Headlight bulbs- जरी तुमच्या गाडीला LED किंवा HID बल्ब लावले असतील तरी स्वस्त हॅलोजन बल्ब मार्केट मध्ये उपलब्ध आहे जे तुम्हाला 500 रुपयापर्यंत दोन मिळतील गाडीचा एक जरी बल्ब रात्रीच्या वेळी विशेष करून पावसाळ्याच्या दिवसात फ्युज झाला तर गाडी चालवणं खूप अवघड होऊन जात. त्यामूळे किमान हॅलोजन चे २ बल्ब गाडीमध्ये असावेत.
टिप्पणी पोस्ट करा